पुणे | पुण्यातील बिबवेवाडी येथील यश लॉन्स याठिकाणी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2च्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या औक्षणाने करण्यात आली. यावेळी नेल आर्ट, पॉट मेकर, बांगड्या बनवणे, चार्लिंग चापलिंग, बबल मशीन, क्र्याकर शो, डार्ट गेम, बास्केट बॉल, बकेट बॉल, रिंग गेम, होला हो, दिवाळी डेकोर, बॉलीवूड नृत्य अशा विविध प्रकारच्या खेळ व नृत्याचे आयोजन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली.
आनंद व समाधानाची दिवाळी
“दिवाळी हा आनंद आणि समाधानाचा सण आहे. यावेळी उपस्थित राहिलेल्या प्रत्येक लायन सदस्याने दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच विविध गाण्यांवर ताल धरला आणि दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दीपोत्सव हा प्रकाश निर्माण करतो. अंधारातून प्रकाशमान होताना आपले सर्वांचे आयुष्य देखील असेच प्रकाशमान होवो आणि आपल्यामुळे दुसऱ्याचे आयुष्यसुद्धा समृद्ध व्हावे हाच लायन्स क्लब च्या सेवाकार्याचा अर्थ आहे. त्यामुळेच हा दीपोत्सव खास होता.”
- लायन विजय भंडारी (प्रांतपाल, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2)