पुणे | नुकत्याच कोचीमधील हॉटेल क्राऊन प्लाझामध्ये ‘ग्लोबल फूड अँड हॉस्पिटॅलिटी अवॉर्ड्स २०२३’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये पुण्यातील नामांकित सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमला (एससीएचएमटीटी) ‘बेस्ट कॉलेज फॉर हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड कलिनरी आर्टस् इन इंडिया’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त’च्या वरिष्ठ फॅकल्टी प्रा. प्रीती कुमठा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मेरिट अवॉर्ड्स अँड मार्केट रिसर्चच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिया पानवर यादेखील उपस्थित होत्या.
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील गुणवत्तापूर्ण व प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण, इंटर्नशिपच्या संधी, प्लेसमेंट्स आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी या सर्व बाबी लक्षात घेऊन ‘एससीएचएमटीटी’ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
जागतिक स्तरावरील कामाचे स्वरूप, तेथील संधी या सर्व गोष्टींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून ‘एससीएचएमटीटी’च्या वतीने नामांकित वैश्विक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये स्विस्सम रशिया, लिंकन विद्यापीठ मलेशिया, लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपिटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट (एएचएलईआय), आदी संस्थांचा समावेश आहे. ‘जीएचआरडीसी’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘एससीएचएमटीटी’चा टॉप हॉटेल मॅनेजमेंट इन्सिट्यूट्स ऑफ एक्सलन्स इन इंडियामध्ये पाचव्या स्थानावर, तर महाराष्ट्रातील प्रायव्हेट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवर्गात तिसऱ्या स्थानावर समावेश झाला होता.
“फूड व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, जिथे विविध प्रकारची रेस्टॉरंट्स, अन्न सेवा पुरवठादार, शेफ आणि अन्न-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या घटकांची निवड विविध स्तरांवर केली जाते. पुरस्कार विजेत्यांकडून त्यांचा युनिक सेलिंग पॉईंट, इनोव्हेशन्स, उपलब्धी यांचे दर्शन घडवले जाते. ‘एससीएचएमटीटी’मध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकवृंद, उत्तम पायाभूत सुविधा आहेत. आजवर विक्रमी प्लेसमेंट्स करत देशात आणि विदेशात ‘एससीएचएमटीटी’चे विद्यार्थी यशस्वीपणे आपले करिअर घडवत आहेत. सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, अमेरिका, न्यूझीलंड यासह इतर अनेक देशांत ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. मॉरिशसमधील शांग्रीला हॉटेल, जर्मनीतील रिटलबर्ग हॉटेल, मलेशियातील हिल्टन, चीनमधील इंडियन किचन स्पाईसेस लिमिटेड, सिंगापूरमधील द रिजंट, अमेरिकेतील हॉलिडे इन, फ्लोरिडामधील रिनाइसन्स, पटायातील सन सिटी, सिंगापूरमधील मेरियट यांसारख्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. तसेच अनेकांनी आपला स्वतःचा व्यवसायही सुरु केला आहे.”
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्सिट्यूट्स
यावेळी संजीव कपूर यांनी उपस्थित तरुण शेफना मार्गदर्शन करत आयुष्यातील चढ-उतारांना सकारात्मकपणे घेत उत्तम ग्राहकसेवा देण्याचा सल्ला त्यांनी दिला. चेहरा सदैव हसतमुख ठेवून काम केले, तर येणाऱ्या अडचणींचा सहज सामना करता येतो, असेही त्यांनी नमूद केले.