सिलीगुडी | पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमात भाषण करत असताना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यक्रम काही वेळासाठी थांबवण्यात आला. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना भोवळ आल्याचे सांगितले जात आहे.
नितीन गडकरी एका कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमात भाषण केले. त्यांच्या याच भाषणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली. त्यांना भोवळ आल्याचे समजल्यानंतर कार्यक्रम काही वेळासाठी थांबवण्यात आला. गडकरींच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्याने त्यांना भोवळ आल्याचे म्हटले जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, गडकरींना यापूर्वीही शिर्डी, सोलापूर येथील भरसभेत भोवळ आली होती. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका कार्यक्रमात त्यांना भोवळ आली आहे.