पुणे | पुण्यातील गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर येथे सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात आज हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी श्री सुक्तपठण केले. माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महावीर इंग्लिश मिडिअम स्कूल, आर.एम.डी स्कूल कात्रज कोंढवा व मनसुकभाई कोठारी नॅशनल स्कूलचे १००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत उपस्थित सर्वांनीच माँ आशापुरा माता मंदिराच्या परिसरात श्री सुक्तपठन केले, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही याठिकाणी विविध प्रकारच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच श्री सुक्त पठण हा एक कार्यक्रम होता. श्री सुक्त पठण करताना त्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने या तीनही शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला. व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे विजय भंडारी, चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, विजयकांत कोठारी, आदेश खिवंसरा, राजेंद्र गोयल, श्याम खंडेलवाल, कुणाल ओस्तवाल, मयूर शहा, अनिल गेलडा, महावीर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या प्राचार्या डॉ. पल्लवी सोमण, आर.एम.डी स्कूलच्या प्राचार्या स्वाती बहुलेकर, मनसुकभाई कोठारी नॅशनल स्कूलच्या प्राचार्या वर्षा कोकील, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी आणि भाविक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.