पुणे | दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील गंगाधाम चौक याठिकाणी असलेल्या माँ आशापुरा माता मंदिरात शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या यशस्वी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये प्रशासकीय ज्योती कदम, आरोग्य डॉ. सविता कांबळे, मनोरंजन गार्गी कुलकर्णी, कला अंजली जोगळेकर, डिजिटल झुंबरबाई लटपटे, उद्योग सोनाली भुतडा, पोलीस पोलीस उपअधीक्षक (सीआयडी) पल्लवी मेहर, क्रीडा ऋतुजा भोसले, लायन पुरस्कार शैलजा सांगळे, शिक्षण मृणाल गांजळे, साहित्य मनस्विनी लता रवींद्र, प्रशासन सरिता नरके, सामाजिक ऋतुजा मून उदय चॅरिटेबल ट्रस्ट, शौर्य सोनल करगळ या सर्व यशस्वी महिलांना अशा विविध प्रकारचे पुरस्कार प्रमुख पाहुणे संगीता बिजलानी आणि विशेष अतिथी आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नवरात्रोत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात विविध प्रकारच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच यशस्वी नवदुर्गा सन्मान २०२३ हा पुरस्कार सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
यावेळी माँ आशापुरा माता मंदिराचे अध्यक्ष विजय भंडारी, भारती भंडारी, चेतन भंडारी, लीना भंडारी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल आणि मंगेश कटारिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.