राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर राहुल गांधींनी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा काढली. १४ जानेवारीपासून सुरु झालेली हि यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे.. या यात्रेदरम्यान आतापर्यंत काय काय घडलं… हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेली भारत जोडो यात्रा सकारात्मक वातावरण निर्माण करणारी होती. राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास तसा फायदाही झाला. राहुल गांधी सामान्य माणसांशी जोडून घेत आहेत हे लोकांना पटत आहे. आता भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी पुन्हा तसा प्रयत्न केला असला तरी काँग्रेसची पडझड काही थांबलेली नाही… भारत जोडो यात्रेवेळी महाराष्ट्रात त्याचे नियोजन करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कांग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारत जोडो न्याय यात्रा येण्यापूर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा या बड्या नेत्यांनीही काँग्रेसची साथ सोडली… आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या या यात्रेचा महाराष्ट्रात कसा परिणाम होतो? हे येत्या काळात स्पष्ट होईल…