पुणे | लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने डेंटल क्लिनिकचे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नगर, कोपरगाव, मनमाड आणि मालेगाव अशा अनेक शहरात डेंटल क्लिनिक उभारण्याचा डिस्ट्रिक्टचा मानस आहे..त्याप्रमाणे दि. ७ मार्च रोजी पुण्यातील जय गांधी कॉम्प्लेक्स, मार्केटयार्ड परिसरातील हमाल व झोपडपट्टीवासियांसाठी डेंटल क्लिनिक उभारण्यात आले आहे. तसेच कोथरूड येथील सुबुध हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, दशप्रभा हाईट्स देहू आणि गावडे वस्ती लवळे या गावातही डेंटल क्लिनिक उभारण्यात आले आहे. या डेंटल क्लिनिकचे उद्घाटन प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांना दातांच्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागत परंतु पैशाअभावी त्यांचे योग्य ते उपचार होत नाहीत त्यांची हीच गरज ओळखून डिस्ट्रिक्टच्या वतीने या डेंटल क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना अल्पदरात उपचार मिळणार असल्याचे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांनी सांगितले आहे. लायन दीपक शहा आणि लायन प्रशांत शहा यांच्या सहकार्याने या डेंटल क्लिनिकचे लोकार्पण विविध ठिकाणी होत आहे…या डेंटल क्लिनिकच्या अभियानामध्ये विविध डॉक्टर सहभागी झाले आहेत.
दरम्यान, या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण १५ डेंटल क्लिनिकचे उद्घाटन झाले आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने असे एकूण १०० डेंटल क्लिनिक उभारण्यात येणार आहे.